शिंदे-फडणवीस सरकारच वाढणार टेंशन, ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आतापर्यंत एक वर्ष उलटून गेल आहे. पण राज्यात अद्यापही या नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील आमदारांना मंत्री पदाची इच्छा आहे. आणि ते त्यांनी कॅमेरासमोर देखील बोलून दाखवले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं म्हटलं जातंय. पण शिंदे-फडणवीस फक्त याबाबतचे वक्तव्य करुन वेळ मारुन नेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. या आमदारांचा दबाब एकीकडे असताना शिंदे-फडणवीस यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले?
नांदेडमध्ये उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात हा आमदार मंत्रीपद घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, या मराठवाड्याचा नेता आम्हाला मंत्रीपदावर न्यायचा आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.