१५ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सोन्याच्या दातांमुळे गवसला !

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी सोन्याच्या दातांमुळे पोलिसांना सापडला असून प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) असे या आरोपीचे नाव आहे. ओळख लपवून राहणाऱ्या प्रवीणला विम्याचे रकमेचे आमिष देऊन त्याला पोलिसांनी पकडले.

हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपये शौचालयात कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा कट रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.

गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. जडेजा बाबत पोलिसांकडे जास्त माहिती नव्हती. फक्त आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव व पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपस करून आरोपीला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.