तुर्कीत मदत कार्य करणाऱ्या भारतीय महिला अधिकाऱ्याचे कौतुक

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य करत असलेल्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याच्या गालावर चुंबन घेतानाचा तुर्की महिलेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. भारताने बचाव पथकासह मदतीचं सामान तुर्कीमध्ये पाठवलं आहे. NDRF पथकासह जीवनावश्यक साहित्य, वैद्यकीय साहित्य आणि डॉक्टरांची टीम तुर्कीमध्ये बचावकार्यात गुंतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.