Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…
    जळगाव जिल्हा

    मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली आहे. तर दुचाकीवरील सोबत असलेला एक जण थोडक्यात बचावला आहे. ही घटना मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयसमोर घडली आहे. किसन उर्फ कृष्णा तलवारे (३४) रा. बोदवड. ह.मु. इच्छापुर ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.

    मुक्ताईनगर शहरातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर ते   बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर अपघातात अवजड वाहतूक करणारा ट्रक हा अवैधपणे रस्त्याच्याकडून जात होता तो बेशिस्त उभा राहिला. दरम्यान याच काळात  मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १० डीएल ३५५५) ला आव्हरटेक करतांना दुचाकीने किसन तलवारे व तुळशीराम वानखेडे हे  दोघेजण येथून सोबत जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार हा बसच्या चाकाखाली आला. यावेळी किसन तलवारे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात सुदैवाने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर शहरातील स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आलेला आहे. रात्री उशिरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    #muktainagar accident Man Died
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif