मुक्ताईनगरमध्ये प्रशासकीय इमारतीस मान्यता

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर (Muktainagar) तालुका ८२ गावांचा तालुका मुख्यालय ठिकाण असलेल्या मुक्ताईनगर येथे सर्व शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी भटकंती करावी लागत होती. त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे २०.०१.२०२२ रोजी तसेच नवीन शिंदे फडणवीस सरकारमधील आताचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दि.१८ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी लेखी पत्रव्यवहार करून मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम मंजुरीसाठीची मागणी केली होती.

यासाठी त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नोव्हेंबर २०२२ मध्ये सदरील मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस महसूल विभागामार्फत १३.२३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

तरी मुक्ताईनगर तालुक्यातील जनसामान्यांना सर्व शासकीय एकाच इमारतीत उपलब्ध होणार असल्याने त्यांची गेल्या अनेक वर्षापासून होत असलेली गैरसोय दूर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.