साई चरणी नतमस्तक होताच जीव सोडला (व्हायरल व्हिडीओ)

0

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क

साईंच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मंदिरातच मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राकेश मेहाणी असे आहे.

राकेश गुरुवारी मध्य प्रदेशच्या कटनी येथे साईमंदिरात आले होते. दर्शन घेताना ते नतमस्तक झाले आणि तिथेच त्यांनी जीव सोडला. ते बराच वेळ खाली वाकून होते. त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान उपस्थित व्यक्तींनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी राकेश यांचा मृत्यू झाला. सदर घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.