‘दृश्यम 2’ ची जादू, तब्बल इतक्या कोटींची कमाई

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकताच दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली आहे. ‘दृश्यम’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अजूनही 2 ऑक्टोबरला सत्संगवरून सोशल माध्यमांवर मीम्स व्हायरल होत असतात. त्यामुळे दृश्यम 2 बॉक्स ऑफिसवर कितपत यश मिळवतो याची प्रत्येकाला उत्सुकता होती. आता या चित्रपटाने मोठी कमी केली आहे.

आत्तापर्यंत ‘दृश्यम 2’ ने बॉक्स ऑफिसवर 160 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचा अप्रतिम थ्रिलर सस्पेन्स प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचत आहे. जवळपास 1 कोटी लोकांनी हा सिनेमा सिनेमागृहात पाहिला आहे. अजय देवगणचा गेल्या वर्षी सुभेदार तान्हाजीनंतर हा दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो.

दरम्यान, ‘दृश्यम 2’ मध्ये अजय देवगणने त्या हत्येबाबत पोलिसांना माहिती दिली की नाही? याबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना थ्रिल अनुभवायचा आहे, कदाचित या कारणामुळेच प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.