मनसेचे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यातर्फे निवेदनाची प्रतिची दखल घेण्याबाबत अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. महाराष्ट्र शासन भरती 2023 मध्ये आयटी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्या भरत्या महाराष्ट्रभर काढल्या जात आहे त्यामध्ये फॉर्मची रक्कम 900 ते 1000रू. एका विद्यार्थ्याकडून घेतली जात आहे. करोडो रुपयाचा धंदा आयटी कंपनी करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्ष द्यावे. गोरगरीब इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीच सात वर्षापासून नोकऱ्या नाही. निघाल्या तर 1000 ते 900 रुपये फी भरावी लागत आहे. होतकरू कष्टकरी विद्यार्थी यांच्याकडून लूट होत आहे. यावर जाहीर निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. कंपन्यांचा कॉन्ट्रॅक्ट बंद करून, शासकीय स्वरूपात परीक्षा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना 50 ते 100 पर्यंत फी असली पाहिजे. जेणेकरून गोरगरिब विद्यार्थ्यांना परीक्षेत भुर्दंड भरावा लागणार नाही. व ज्यादा पैसे आकारून विद्यार्थ्यांची लूट होणार नाही. निवेदन देते वेळेस मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.