युवारंग 2022 मध्ये मु. जे. महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

0

 

फैजपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या पाच दिवस कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा रंग 2022 हा अत्यंत ऐतिहासिक ठरला असून जळगावच्या मु. जे. महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. याचा आज फैजपूर सारख्या ऐतिहासिक नगरित युवारंगाचे मोठ्या थाटात बक्षीस वितरण समारंभ झाला . या प्रसंगी कलावंत चि.अमोल पाटील, प्रा.नंदा वसावे, प्रा.हरेश चौधरी, प्रा.विजय पालवे व इतर विद्यार्थ्यांनी, संघ व्यवस्थापकांनी आपल्या प्रतिक्रिया देत असताना महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा ही चीरकाल लक्षात राहील अशी प्रतिक्रिया देत भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे आकर्षण स्थान विनोदी अभिनेता गौरव मोरे, स्वागत अध्यक्ष एस.के. चौधरी उपअध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर, बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉ.एस.टी. इंगळे, प्रो. कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.  शिरीष चौधरी यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित  काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, निकाल पत्र हस्तांतरण डॉ.विनोद पाटील कुलसचिव कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी ,युवानेते धनंजय चौधरी, युवारंग 2022 चे समन्वयक एस.व्ही.जाधव, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सह समन्वयक डॉक्टर राकेश तळेले, तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे पदाधिकारी डॉ.एस.के.चौधरी लीलाधर चौधरी प्रा.के.आर. चौधरी, बापू वाघुळदे, प्रा.एम टी फिरके, प्रा.एन.ए.भंगाळे, प्रा.डी.ए.नारखेडे, डॉ. एस.एस.पाटील प्राचार्य व्ही.आर.पाटील,संजय चौधरी, डॉ. तुषार फिरके, डॉ.जी. जी.कोल्हे,प्राचार्य डॉ.सुनील पवार,प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे, सिनेट सदस्य प्रा.ई.जी. नेहते, डॉ.सुनिता पालवे, डॉ.संदीप नेरकर डॉ.पद्माकर पाटील ,डॉ.शिवाजी पाटील दिनेश चव्हाण, नेहा जोशी, स्वप्नाली महाजन, अमोल पाटील, अजय पाटील, सामाजिक, विद्या परिषदेचे सदस्य डॉ.हेमंत महाजन, मोहंमद मुनव्वर खान,रवींद्र निकम, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, यांनी आपल्या मनोगत सांगितले की माणसातील उपजत गुणांना जर वाव मिळाला तर त्याचे सोनं झाल्याशिवाय राहत नाही, विद्यार्थी अवस्थेत अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत असल्यामुळे या सर्व गोष्टींचा मला अनुभव आहे म्हणून जुनी आठवण ताजी झाली, स्पर्धकांच्या भावभावनांचे अतिशय जवळून अनुभव घेतलेला असल्यामुळे कला सादर करत असताना मनावर असलेल्या दडपण मी समजू शकतो म्हणून कोणते ही अपयश हे अपयश नसून शिकण्याची संधी असते असा सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनी विजयाचा उन्माद न करता आपला विजय साजरा करावा आणि ज्यांनी पारितोषिक अति अल्पशा क्रमांकामुळे गमावले असेल अशा सर्व प्रतिवादी विद्यार्थ्यांनी सुद्धा पुन्हा तयारीला लागावे कलाक्षेत्र सोबतच शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवावे उच्च शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदांवर जाऊन हा देश सांभाळावा अशी अशा व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले

डॉ.उल्हास पाटील यांनी तेरी सुगंध के आगे गुलाब क्या होगा तुम लाजवाब हो तुम्हारा जवाब क्या होगा अशी शायरी करत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गौरव मोरे यांच्या विषयी बोलत असताना कार्यक्रमाच्या आयोजना बाबतीत संस्थेचे कौतुक केले, प्राध्यापकांनी दिलेल्या सेवा पाहून स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांची आठवण झाली त्यांच्या परिवाराचे हे संस्कार आहेत म्हणून ही संस्काराची भूमी म्हणून ओळखली जाते, शिरीष चौधरी यांच्या या सर्व मधुस्नेह या परिवारातील सर्व सदस्यांनी पुन्हा दाखवून दिले मत व्यक्त केले.

बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षांचे मनोगत
डॉ.एस.टी.इंगळे

पाच दिवसात सर्व कलाकारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता जिंकण्याची आस होती क्षितिजाला कवेत घेण्याची जिज्ञासा होती असे वर्णन करत फैजपूर सारख्या ऐतिहासिक भूमीवर आपण सर्वांनी कला सादर केली पाच ही रंगमंचांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या त्या सर्व कलाकारांचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो आपण या रंग महोत्सवाच्या माध्यमातून कला क्षेत्रात पुढे जात राहवे, कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेले गौरव मोरे यांच्यासारखे मोठे सेलिब्रिटी व्हावे अशा अपेक्षा व्यक्त करत उपस्थित सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

स्वागत अध्यक्ष प्रा.एस.के.चौधरी उपाध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर व सहकारी शिक्षक यांचे सर्वांनी भरभरून कौतुक केलं त्या कौतुका मुळे या संस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने आम्हाला खूप अभिमान वाटत आहे युवा रंग 2022 येथे आमच्या महाविद्यालयात घेण्यात यावा हा निर्णय अतिशय सार्थक ठरवला याचे प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी आपण सर्वांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळाले आहे असे सांगत सर्व पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले, तसेच पारितोषिक विजेते तलाकरांचे अभिनंदन केले व ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेले नाही त्यांचे विशेष कौतुक करत तपुन्हा प्रयत्नांची पराकाष्टा करून पुढील युवारंगात बक्षीस कसे मिळविता येलील त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

युवा नेते धनंजय चौधरी
युवारंग या युवकांच्या महोत्सवात युवक म्हणून जर मी बोललो नाही तर युवकांच्या भावनांचे उच्चाटन होणार नाही म्हणून आपल्या सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी मी आपला प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी उपस्थित आहे, युवकांनी नेहमीच आपल्या पूर्वजांचा आदर्श घ्यावा आपल्या कलागुणांसाठी योग्य ते व्यासपीठ शोधत राहावे, समाजासमोर त्या कलागुणांचे प्रदर्शन करावे आणि या देशाला सांस्कृतिक सामाजिक आणि कलात्मक विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. अपेक्षा व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.

आभार प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी सर्व उपस्थित यांचे पदाधिकाऱ्यांचे, कलाकारांचे, सहकालाकारांचे, समिती प्रमुखांचे समिती सदस्यांचे विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणातील सदस्यांचे, कार्यकारी मंडळाचे आणि या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे सेवा देणारे विद्यार्थी स्वयंसेवक, इलेक्ट्रिक, म्युझिकचे, पत्रकार, फोटोग्राफर, व इतर उपकरणांची व्यवस्था सभाळणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून महाविद्यालयांचे प्राचार्य प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या विद्यार्थ्यांमध्ये येऊन आमच्याशी हितगुज केली व आमचा उत्साह वाढविण्याचे कार्य केले अशा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
सूत्रसंचालनआणि बक्षीस वितरण वाचन कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ.राजश्री नेमाडे, प्रा.दीप्ती साखरकर, प्रा.समृद्धी महाजन यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.