महाराष्ट्र राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियान

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) भारत सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजकता समितीच्या अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाने राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये महिला उद्योजकता विकास अभियान 23 सप्टेंबर ते  24 फेब्रुवारी 2023 या दरम्यान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात महिला उद्योजकता संस्कृतीला चालना देणे, जिल्हा पातळीवर महिलांच्या उद्योजकता विकासास चालना देणे, महिलांच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय आणि नाविन्यास प्रोत्साहन देणे जेणेकरून महाराष्ट्रातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी राहू शकतील  अशाप्रकारे अभियानाचे मुख्य उद्दिष्टे असणार आहे.

अशी माहिती महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी दिली. वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे महाराष्ट्र चेंबरच्या 94 वार्षिक सभेत महिला उद्योजकता विकास अभियान योजनेचे लोकार्पण नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, महिला उद्योजकता समिती चेअरपर्सन संगीता पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, रवींद्र मानगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, शुभांगी तिरोडकर, महिला समिती सदस्य गौरी खेर, गीता करमसी, श्वेता इनामदार तसेच चेंबरचे सर्व  एक्सपर्ट कमिटी, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर्स व महाराष्ट्रातील सर्व सदस्य उपस्थित होते. या योजनेंतर्गत महिला उद्योजकता समिती व संबंधित शासकीय अधिकारी सर्व 36 जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजकता परिषदेच्या माध्यमातुन जनजागरण करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.