मनाला जिंकणे, वश करणे सर्वात महत्त्वाचे !

0

प्रवचन सारांश 19.09.2022 

एक मन, चार कशाय आणि पाच इंद्रियांना वश करणे, त्यांच्यावर विजय मिळविणे याचे गुपित आगम शास्त्रात सांगितले आहे. सर्वात आधी मनाला वश करावे असे आवाहन पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनातून केले.

माणूस जाती, जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो. कोणत्याही जातीत जन्म घेतला असला तरी तो वाईट कर्म करतो त्याला कर्म चांडाळ म्हणू शकतो. नितीकारांनी ४ प्रकारचे कर्म चांडाळ सांगितले आहेत. इर्षा चांडाळ, चुगली चांडाळ, कृतघ्न चांडाळ आणि दीर्घ क्रोधी चांडाळ असे प्रकार आहेत. ‘मेरी भावना’ प्रवचन श्रृंखलेत चिंतन करण्यात आले. अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांनी सुश्राव्य व अर्थपूर्ण प्रवचन केले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्ट्धर आचार्य श्री. पार्श्वचंदजी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे.

प्रवचनात एक रूपक कथा सांगितली. एकाने घरासमोर वृक्ष लावला पण शेजारच्या वृक्षाची छाया, फुल व फळ मिळत होते. इर्षा उत्पन्न झाली तो वृक्ष कापून टाकतो. पुन्हा वृक्ष बहरला पुन्हा शेजारच्याला वृक्षाचा फायदा मिळाला. यावेळी मात्र वृक्ष मुळासह काढून टाकला. ऊर्जा ही सामाजिक कीड आहे. इर्षा व स्पर्धा दोन शब्द विभिन्न अर्थाचे आहेत. जीवनात इर्षा नव्हे तर स्पर्धा असायला हवी. ‘मेरी भावना’ ही रचना मानवाला शिक्षण देत असते, शिकवत असते. कुणी प्रगती करत असेल तर इर्षा केली जाते. पूर्वी पिता-पुत्र यांच्यात इर्षा निर्माण होत नसे. ‘बाप से बेटा सवाई’ असे म्हटले तर वडिलांना आनंद वाटायचा. आता इर्षा निर्माण होते. इर्षा करणे सोडले तर समाजात सौजन्य व सौहार्द वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आजच्या प्रवचनातून व्यक्त केली.

डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी ‘आगम शास्त्र’ प्रवचन श्रृंखलेत आजच्या प्रवचनात सांगितले की, केशी कुमार व गौतम गणधर यांचा संवाद चालला होता. माणसाचा सर्वात मोठा शत्रु कोणता असा प्रश्न विचारला गेला त्यावर उत्तर मिळाले ते असे, की ज्याने मनाला जिंकले तर चार कशाय जिंकले आणि पाच इंद्रिये यावर विजय प्राप्त केला तर मानव सर्व गोष्टींना जिंकू शकतो. त्याचे कुणीच शत्रु असणार नाहीत. आजचा मानव कुणाला ना कुणाला आपल्या ‘वश’ करू इच्छीतो. परंतु स्वतःच्या मनाला आपण किती ‘वंश’ ठेवतो हे चिंतन करायला हवे. ह्या संदर्भात पती-पत्नीचे उदाहरण सांगितले. निग्रह, पर्याप्त व बसना अशा तीन पध्दतीने मन वश करू शकतो. ‘मन को वश करना सिखो यही कल्याण है।’ आगमकारांनी मन वश करणे कठीण सांगितले असले तरी सामान्य माणूस मनाला वश करू शकतो. याबाबत आगम शास्त्रात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या प्रवचनात कथन केल्या.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.