प्रियकराच्या पत्नीची दिली सुपारी; भरदिवसा गळा कापून खून

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मयत स्त्रीच्या पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते व त्यांना एकत्र राहायचे होते. मात्र त्यांना गुन्ह्यातील मयत अडसर ठरत होती. त्यामुळे प्रियकराच्या पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रियसीने प्रियकराच्या पत्नीला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्या आरोपींना मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी.पथकाने दमदार कामगिरी करून सुपारी घेवून मर्डर करणारे तिघे खुंखार गुन्हेगार पकडून देवून मुंबई पोलिसांच्या ताब्यात १८ सप्टेंबर रोजी दिले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस स्टेशन खांदेश्वर नवी मुंबई येथे अप. क्र.२४३/२०२२, कलम ३०२ भा.द.वि.प्रमाणे सदर पो.स्टे.ला गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील मयत स्त्रीच्या पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य प्रेम संबंध होते व त्यांना एकत्र राहायचे होते. त्यामुळे प्रियकराच्या पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रियसीने प्रियकराच्या पत्नीला जिवेठार मारण्यासाठी आरोपी रोहीत राजु सोनोने (वय २२, रा.शिवाजी नगर, मलकापूर ता. मलकापुर, जि.बुलढाणा), पंकज नरेंद्रकुमार यादव (वय २६, रा.जोनपुर, उत्तर प्रदेश), दिपक दिनकर चोखंडे (वय २५, रा.बेलाड, ता.मलकापुर, जि.बुलढाणा) यांना संपर्क करुन त्यांना ३ लाखाची सुपारी दिली. सदर सुपारी पैकी २ लाख रुपयाची रोकड आरोपीतांनी प्रियसीकडुन स्विकारली. त्यानंतर १६ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपींनी भरवस्तीत मयत पत्नीस गाठुन तिचे गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिचा गळा चिरुन तिला ठार मारले.

सुपारी घेवून मर्डर करणाऱ्या आरोपीतांचे शोधकामी १८ सप्टेंबर रोजी सकाळी मुंबई पोलीसांची टिम मलकापूर शहर पो.स्टे.ला आल्यावर त्यांनी आरोपी तपासकामी पो.स्टे.ला मदत मागीतल्यावर पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, उप विभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, व ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार तिन्ही आरोपीतांचा शोध घेणेकामी पो.स्टे.डी.बी.पथकाचे स.पो.नि.सुखदेव भोरकडे, पो.का.संतोष कुमावत, पो.का.प्रमोद राठोड, पो.का.अनिल डागोर, पो.का.ईश्वर वाघ, पो.का.सलिम बर्डे असे मुबई पोलीसांचे टिमसह आरोपी शोध कामी रवाना होवून दिवसभराचे अथक प्रयत्नानंतर बेलाड फाटा मलकापूर येथून वरील तिन्ही आरोपीतांचा सिने स्टाईलने पाठलाग करुन बेड्या ठोकून पुढील कारवाई कामी मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.