पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

0

जळगाव ;- रविवारी रात्री रेमंड चौफुलीवरून रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात कारने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्या तरुणाचा आज सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुषण पवनकुमार जैन वय ३४ रा. शिवराम नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुषण जैन हा तरूण आपल्या आई पवनाबाई यांच्यासोबत शिवराम नगरात वास्तव्याला होता. तो मुंबईत खासगी नोकरीला होता. काही दिवसांपासून भूषण हा घरी जळगावात आलेला होता. रविवारी रात्री रेमंड चौफुलीवरून तो पायी जात असतांना त्याला अज्ञात कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरूणाच्या पश्चात आई आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.