12 मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12.03.2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभांमध्ये 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन/समर्पण करतील आणि 10 वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवतील.

महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 506 प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. यापैकी 32 प्रकल्प भुसावळ विभागांतर्गत येतात ज्यात 25 एक स्टेशन-एक उत्पाद स्टॉल, दोन माल गोदामे, बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, मनमाड-जळगाव तिसरी लाईन, एक जन औषधी केंद्र आणि दोन रेल्वे कोच रेस्टॉरंटचा समावेश आहे. भुसावल विभागात हा कार्यक्रम नासिक, मनमाड़ ,धुले,जलगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर आणि खंडवा येथे आयोजन करण्यात आले आहे.

भुसावळ विभागातील प्रकल्पांची थोडक्यात माहिती:

  1. वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP),
  2. जन औषधी केंद्र,
  3. वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, बडनेरा,
  4. रेल कोच रेस्टॉरंट (RCR),
  5. मनमाड-जळगाव तिसरी लाईनचा प्रकल्प,
  6. खंडवा – सनवाद मेमू (विशेष ट्रेन)

Leave A Reply

Your email address will not be published.