रेल्वे रुळावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

0

जळगाव :- हरिविठ्ठल नगर नजीक रेल्वे लाईन लगत असलेल्या आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वे रुळावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाचे वय अंदाजे ३५ वर्ष वयोगटातील आहे. रेल्वे डाऊन लाईनवर आज दि. ४ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास घटना उघड झाली. ओळख पटवण्याचे आवाहन रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

मयत इसमाच्या एका हातावर जयभिम असे गोंदलेले असून धडापासून पाय वेगळे झाले आहे. मयत इसमाने टक्कल केले असून काळी टोपी, काळा शर्ट,व काळी फुल पॅंट असा त्याचा पेहराव असून शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. कुणाला या इसमाबाबत माहिती असल्यास अथवा ओळख पटवण्याकामी तपास अधिकारी सहायक फौजदार संजय भांडारकर यांचेशी ९८२३० ९८४०४, ७७३८३४१०२२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.