मनपाच्या सहाय्यक आयुक्तपदी तुषार आहेर

0

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी तुषार आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार आहेर हे सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. दोन दिवसात ते जळगाव महापालिकेत रूजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दि.२ फेब्रुवारी रोजी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या शासनाने केल्या आहेत. यात महापालिकेला एक सहाय्यक आयुक्त मिळाले असून मनपाच्या कामकाजात सुसुत्रता आणण्यास मदत होणार आहे. सदर नियुक्तीचे आदेश राज्यशासनाच्या नगरविकास विभागातील उपसचिवप्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. दरम्यान, काही महिन्यापुर्वी शासनाकडून कर मुल्यांकनासाठी आणखी एक उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून त्या देखील १५ फेब्रुवारी पर्यंत रूजू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.