प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्तीला अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईत येउन मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतले आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव होता.

पोलीस ठाण्याच्या परिसरात जमावाने घोषणाबाजी केली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मुफ्ती सलमान अझहरी यांनी ३१ जानेवारीच्या रात्री गुजरातच्या जुनागडमधील विभाग पोलीस ठाण्याजवळ कथित प्रक्षोभक भाषण केले होते. मात्र मध्य रात्रीच गुजरात पोलिसांकडून मुफ्ती यांना गुजरात येथे नेण्यात आले आहे.

मौलाना मुफ्ती सलमान अझहरीयांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, जमावबंदीचं उल्लंघन करणे आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत आरिफ सिद्दीकी आणि इब्राहिम हरबेट या दोन्ही वकिलांनी माध्यमांशी संवाद साधतांना म्हंटल की, “मौलाना मुफ्ती यांना चिंकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. १४१ ची नोटीस देखील त्यांना देण्यात आली नाही. सकाळी ११ वाजेपासून त्यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही याविरोधात हायकोर्टात जाणार आहे आणि यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.