मोदींच्या फोटोला काळे फासणे पडले महागात

काँग्रेस युवा नेते कुणाल राऊत यांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना कुही येथून रविवारी सदर पोलिसांनी अटक केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासल्यामुळे ही अटक करण्यात आली आहे.

विकसित भारत संकल्पना यात्रेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता जिल्हा परिषद कार्यालय परिसरात बॅनर लावण्यात आले होते. कुणाल राऊत शनिवारी आपल्या २० ते २५ समर्थकांसह जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरात पोहोचले. तिथे मोदींचे नाव हटवून भारताचे स्टिकर लावले.

सोबतच फलकावरील मोदींच्या प्रतिमेला काळे फसले. सरकारी योजनांच्या नावाखाली पीएम मोदी स्वतःचा आणि भाजपचा प्रचार करीत असल्याचा आरोपी त्यांनी केला होता. सदर पोलिसांनी पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

रविवारीच त्यांना तडकाफडकी अटक करण्यात आली. ते रविवारी कुही परिसरात जनसंवाद यात्रेवर निघाले होते. त्यांची माहिती मिळताच सदर पोलिसांचे पथक कुहीत दाखल झाले. त्यांना ताब्यात घेऊन नागपुरात आणण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून त्यांना सदर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.