MPSC; मुलाखतीच्या सुधारित तारखा जाहीर

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने आपल्या ट्विटर हॅण्डल वर आणि संकेतस्थळांवर याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी MPSCचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ साठीच्या मुलाखती नियोजित केल्या आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात मुलाखती घेण्यात येणार होत्या मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

२८ फेब्रुवारी रोजी मुंबईत या मुलाखती होणार आहेत. यासाठी आयोगाने परीक्षा क्रमांकानुसार वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबईतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य़ा कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.