एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे १८ तासांनंतर आंदोलन मागे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतले आहे. तब्बल 18 तासानंतर पुण्यातील एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आले. या विद्यार्थ्यांची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार आहे. यावेळी ते मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्या ठेवणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचं लोण पसरले होते. . पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली होती.

त्याची अखेर दखल घेण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.