भुसावळात एकावर एमपीडीएची कारवाई

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ येथील कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (रा.अमरनाथ नगर) याच्याविरुद्ध ‘ स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

जितेंद्र कोल्हे याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, विनयभंगसह, घरफोडीसह गंभीर दुखापतीचे असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल आहेत. याशिवाय अदखपलपात्र पाच गुन्हे दाखल आहेत. जितेंद्र रामदास कोल्हे याची मध्यवर्ती कारागृह येरवडा जिल्हा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहा.निरीक्षक हरीष भोये, गुन्हे शाखेचे एएसआय युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, बाजारपेठ उपनिरीक्षक गणेश मुर्‍हे, हवालदार आत्माराम भालेराव, कॉन्स्टेबल योगेश महाजन यांच्या पथकाने संशयीताला ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात हलवले.

Leave A Reply

Your email address will not be published.