मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील एका सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हॉस्पिटलच्या सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हॉस्पीटलमधील सुपरवायझर खालीद अहमद बुऱ्हानोददीन काझी याने पिडीतेस थम मशिनला थम करु दिले नाही. तसेच वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवण्याची मांगणी करुन पिडीतेस मानसिक त्रास दिला. तसेच पिडीतेस म्हणाला की, तू माझ्याशी संबंध ठेव. नाही तर तुला मी कामावर ठेवणार नाही, असे बोलून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी सुपरवायझर खालीद काझी विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.ना. अलका शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.