गावगुंडांना कायद्याचे भय नाही; दलित नवरदेवाच्या वरातीवर दगडफेक…

0

 

छतरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घोड्यावर स्वार झालेल्या दलित वराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दलित वराला पाहून गावकरी संतापले. त्यांनी वराच्या लग्नाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. मिरवणुकीत सुमारे 40-50 वराती सहभागी झाले होते. दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात २० आरोपींची नावे आहेत.

छतरपूरच्या बक्सवाहा पोलीस स्टेशन हद्दीतील चौराई गावातील सोमवारी संध्याकाळची ही घटना आहे. चौराई गावातील रितेश अहिरवार यांची मिरवणूक सागर जिल्ह्यातील शहागडकडे निघाली होती. गावातील रसुखदारांनी त्यास विरोध केला. गावातील गुंडांनी आधी उद्धटपणा दाखवला आणि नंतर मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच एसपी अमित सांघी आणि एएसपी यांच्यासह दोन पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतरही दगडफेक थांबली नाही. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

त्यानंतर पोलिसांच्या देखरेखीखाली सायंकाळी उशिरा ही मिरवणूक शहागडकडे रवाना झाली. मिरवणुकीला पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यासह आयपीसी कलम 147, 148, 353, 149,332 294 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.