पोलीस निरीक्षक एपीआय मनोज भोसले यांना निलंबित करण्यासाठी निवेदन

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेच्या नावाखाली बामसेफ नावाचा लोगोचा वापर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून व समाजातून खंडणी गोळा करून त्याचा गैरवापर करणारा कमलकांत काळे तसेच ॲट्रॉसिटी मधील आरोपी अशोक भाटकर यांना पाठीशी घालने त्याला पळून जाण्यासाठी सहकार्य करणे, तपासात दिरंगाई करून न्याय नाकारणे, तथा फिर्यादीवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांना संभ्रमित ठेवणे, यामुळे तपास अधिकारी एपीआय मनोज भोसले यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आज धरणगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक उद्धव धुमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाला पाच टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून, पहिला टप्पा दिनांक सहा जून रोजी तालुका निरीक्षकांना निवेदन देऊन पूर्ण करण्यात आला. दुसरा टप्पा जिल्हास्तरीय धरणे आंदोलन दिनांक 16 जून रोजी होणार आहे.

तिसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रदर्शन रॅली 24 जून रोजी होणार आहे. चौथा टप्पा एक लाख लोकांचा भव्य मोर्चा नऊ जुलै रोजी होणार आहे. आणि पाचवा टप्पा सामाजिक न्यायासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी घेराव घातला जाणार असून 16 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे, भारत मुक्ती मोर्चा च्या माध्यमातून वरील पाच टप्प्याचे आंदोलन पुकारले गेले असून जोपर्यंत एपीआय मनोज भोसले यांना निलंबित केलं जात नाही. तोपर्यंत संविधानाच्या नियमानुसार भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल अस मत भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश महासचिव मोहन शिंदे यांनी प्रकट केले, याप्रसंगी मोहन शिंदे प्रदेश महासचिव भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य रवींद्र मोरे भारत मुक्ती मोर्चा धरणगाव, शोएब खाटीक राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धरणगाव, मिलिंद शिरसाट भारत मुक्ती मोर्चा धरणगाव, प्रकाश सपकाळे भारत मुक्ती मोर्चा धरणगाव, अनिल बहारे तालुका संयोजक भारत मुक्ती मोर्चा धरणगाव, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.