जैन हिल्स जळगाव येथे फाली संम्मेलनाचा ७ व ८ जून रोजी तिसरा अंतिम टप्पा

0

जळगाव;- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमा अंतर्गत हे ९ वे वर्ष असून पहिले दोन टप्पे पार पडले. या संम्मेलनाचा अंतिम तिसरा टप्पा ७ व ८ जून होत आहे. या तिन्ही टप्प्यामध्ये होणाऱ्या या संम्मेलनास महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

७ जून रोजी जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स मांडले जातात. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स व कृषी इन्होव्हेशन्सच्या स्पर्धेतून पहिल्या पाच क्रमांकाची निवड होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच जनजागृती माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. माहिती पत्रकाचे चित्रा वाघ यांनी कौतुक करीत निधी फाऊंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माहिती पत्रकात महिलांनी घराबाहेर पडताना सोबत घ्यायच्या वस्तू, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, महिलांचे हक्क आणि अधिकार याची जाणीव करून देणारे संदेश देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांना या माहिती पत्रकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती वैशाली विसपुते यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.