मोहन यादव यांनी घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

0

मोहन यादव मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री

 

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी

भोपाळमधील भव्य सोहळ्यात भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते मोहन यादव यांनी बुधवारी मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी यादव यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तर राजेंद्र शुक्ला व जगदीश देवडा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यास जाण्यापूर्वी यादव यांनी भोपाळमध्ये एका मंदिरात पूजा-अर्चना केली. मोहन यांच्या नेतृत्वात ‘डबल इंजिन’ सरकार दुप्पट उत्साहाने काम करीत विकासाचे नवे परिमाण रचेल, असा विश्वास मोदींनी

शपथविधीनंतर व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान या सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नितीन गडकरी यांची
उपस्थिती होती. शपथविधी सोहळ्यापूर्वी यादव यांनी जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भाजपचे संस्थापक विचारवंत श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भाजप कार्यालयात आदरांजली वाहिली. उज्जैन दक्षिणमधून विधानसभेवर गेलेल्या यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि अन्य सर्व क्षेत्रांच्या विकासाला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. वर्ष २००३ नंतर मध्य प्रदेशमधील भाजपचे

 

सर्व तीन मुख्यमंत्री अर्थात उमा भारती, बाबूलाल गौर आणि शिवराजसिंग चौहान हे ओबीसी वर्गातील होते. यादव देखील ओबीसी वर्गातीलच आहेत. मुख्यमंत्रीपदी यादव यांच्या नियुक्तीमुळे भाजपचे दिग्गज नेते आणि चार वेळेस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या चौहान यांच्या युगाचा अंत झाला आहे. त्यांनी जवळपास दोन दशकापर्यंत राज्यातील राजकारणावर दबदबा गाजवला. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव नसतानादेखील भाजप श्रेष्ठींनी धक्कातंत्राचा वापर करत यादव यांना मुख्यमंत्रीपदी बसवले

Leave A Reply

Your email address will not be published.