केस मागे न घेतल्याने जावयाने केले सासू सोबत भयंकर कृत्य

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात चालली केस सासू मागे घेत नाही. याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चक्कूने वार केल्याची घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. या घटनेत अलका विठ्ठल गवळी (वय ५०, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) या गंभीर जखमी झाल्या आहे. या प्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (वय २८, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली, मूळ गाव रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संग्राम बळवंत शिंदे (वय ३८ वर्ष, रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. म्हाडा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात. फिर्यादी रुपाली यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळण्यासाठी कोर्टात केस चालू आहे. आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी (ता.१३) सायंकाळी साडे पाच वाजता नायगाव येथील त्यांच्या सासूच्या घरी आला. व केस मागे घेण्यास सांगितले. पण त्यांची पत्नी रुपाली त्यांना म्हणाली की, यावर ‘जे काही होईल ते कोर्टात होईल’

त्यावेळी संग्राम याने टिफीनच्या पिशवीतून आणलेला धारधार चाकू काढत ‘तुला आज जीवानिशी सोडणार नाही’ असं म्हणत अंगावर धावून गेला त्यावेळी रुपाली यांची आई अलका गवळी मध्ये आल्याने आरोपीने अलका यांच्या पोटात तीन वेळा चाकू घुसवून त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वर केले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.