साकळी येथे ठिबक संच चोरीला, पोलिसात गुन्हा दाखल

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी शिवारातील एका शेतातून पाच हजार किमतीचे जैन कंपनीचे ठिबक सिंचन चोरीला गेलेले असून, संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून एका साकळीच्या एका व्यक्तीविरुद्ध यावल पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, साकळी शिवारातील गट नं.१२६ हे शेत दिलीप तोताराम बडगुजर (रा.साकळी) यांनी निम्मे बटाईने केलेले असून, या शेतातील जैन कंपनीचे काळ्या रंगाचे व पिवळा पट्टा असलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या दि.१३ रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान चोरून नेताना योगेश महाजन (रा. साकळी) आढळला. सदर फिर्यादी दिलीप तोताराम बडगुजर यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याबाबत पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.

साकळीसह परिसरात शेतातुन विविध प्रकारचे शेती साहीत्य चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी खूप त्रस्त झाला आहे. या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अशा या चोऱ्यांना वेळीच आळा घालणे खूप गरजेचे आहे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.