वीटभट्टीला भीषण आग, चिमणी कोसळून ३ जण ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी (१३ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला, त्यात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे चिमणी कोसळून ३० पेक्षा जास्त कामगार मलब्याखाली दाबले गेले आहे. तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वीटभट्टीचा स्टोव्ह पेटवताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात एका वीटभट्टीवर ६० मजूर काम करीत होते. बुधवारी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मजुरांनी वीटभट्टीची चिमणी पेटवायची होती. दरम्यान, काही मजूर चिमणी पेटवण्यासाठी गेले असता, अचानक भीषण स्फोट झाला आणि ६० फूट उंचीची चिमणी कोसळून जमीनदोस्त झाली. या घटनेत चिमणीच्या मलब्याखाली मजूर दाबले गेले.

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर ४ मजुरांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या घटनेत ३० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.