माझ्याशी प्रेम कर” असे म्हणत विद्यार्थीनीचा विनयभंग

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एका शाळेच्या गेटजवळ शाळकरी विद्यार्थिनीचा रस्ता आडवत “माझ्याशी प्रेम कर” असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील अल्पवयीन मुलगी ही १३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी १०.३o वाजेच्या सुमारास साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जात असतांना साने गुरूजी विद्यालयासमोर दुचाकी आडवी लावून लोकेश सुनिल महाजन (रा. यावल देशमुख वाडा) या तरुणाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून माझ्याशी प्रेम कर असे म्हणत तिचा विनयभंग केला.

या घटनास्थळी छेडखानी झालेल्या अल्पवयीन मुलीचा भाऊ या ठिकाणी आला व त्या तरुणास माझ्या बहीणीचे नांव का घेतले असे विचारले असता, लोकेश महाजन याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या कहैन्या देशमुख व वैभव देशमुख यांनी मुलीच्या भावास चापटाबुक्यानी मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून तिन तरूणांविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असुन घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.