पारोळा; राष्ट्रीय महामार्गावर आर.टी.ओ ची वाहनांवर कारवाई

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील विचखेड्याजवळ काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात तीन महिला मृत्यू मुखी पडल्या होत्या त्या तिहेरी अपघातातील वाहनांच्या तपासणीसाठी जळगाव येथील आर.टी.ओ चे पथक पाहाणी करण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी इतर वाहनांची तपासणी करून लायसन्स, वहान परवाना, तसेच अवैधरित्या नागरिकांची वाहतूक, तसेच ओव्हर लोडींग करणाऱ्या वहानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अशा पाच वाहनांवर आरटीओचे पथक सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन, सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल काळे, वाहन चालक लक्ष्मण आगलावे, यांनी कारवाई करून सुमारे दोन लाखाचा दंड वसूल करण्यात आला. विनाकारण वाहनधारकांवर दंड आकारू नये अशी मागणी यावेळी वाहन धारकांकडुन करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.