संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घालणारे तरुण-तरुणी नेमके कोण? महाराष्ट्रातील एक तरुण सहभागी…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी संसदेत शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी लोकसभेत उडी घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेच्या काही वेळापूर्वी संसद भवनाबाहेरील परिवहन भवनासमोर एका तरुणाला आणि एका महिलेला जवळपास तशाच प्रकारचा गॅस चा मारा करताना आणि घोषणाबाजी करताना अटक करण्यात आली होती. संसदेच्या आत सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. मनोरंजन डी. हे म्हैसूर, कर्नाटकचे रहिवासी आहेत.

याशिवाय, दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन भवनासमोर अटक करण्यात आलेल्या दोन आंदोलकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. नीलम (४२) आणि अनमोल शिंदे (२५) अशी त्यांची नावे आहेत. नीलम ही मूळची हरियाणातील हिसार येथील रहिवासी असून अनमोल शिंदे महाराष्ट्रातील लातूर येथे राहतात.

“परिवहन भवनासमोर निदर्शने करणाऱ्या नीलम आणि अनमोल यांनी गॅस पसरवण्यासह ‘भारत माता की जय’ आणि ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणाही दिल्याचे सांगण्यात आले.”

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेतील घटनेबद्दल बोलताना परिवहन भवनासमोर अटक केलेल्या लोकांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “प्राथमिक तपास झाला आहे. नंतर सविस्तर तपास अहवालही दिला जाईल. सध्या दोन्ही व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. दोन लोक संसदेबाहेर होते, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.”

दरम्यान, अमरोहाचे खासदार कुंवर दानिश अली यांच्या म्हणण्यानुसार, संसदेत प्रवेश केलेल्या सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांबद्दल, भाजप नेते प्रताप सिन्हा यांच्या कार्यालयाने दोन्ही तरुणांना पास जारी केले होते. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत उडी मारणाऱ्या दोन्ही तरुणांकडे अश्रुधुराचे नळकांडे होते. झिरो अवर दरम्यान, त्यापैकी एक तरुण टेबलवर उडी मारताना दिसला, तर दुसरा तरुण सार्वजनिक गॅलरीत लटकताना, अश्रुधुराचा मारा करताना दिसला.

Leave A Reply

Your email address will not be published.