विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप...

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथे राहत्या घरात गळफास लावून एका ३४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेचा कुटुंबियांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघळी ता. चाळीसगाव येथील भारती हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील रविंद्र मोची याचेशी झाला होता. रविंद्र मोची यास दारुचे व जुगाराचे व्यसन लागले. या कारणांमुळे रविंद्र व भारती हिचे वारंवार भांडण होत असत. दरम्यान ११ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भारती रविंद्र मोची (वय – ३४) हिचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने भारती हिचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल हरिष अहिरे हे करीत आहेत.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.