मोक्षदा चौधरीची प्रजाकसात्तक दिनी पी.एम. रॅलीसाठी निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

२६ जानेवारी २०२२ रोजी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात तसेच पी.एम. रॅलीसाठी मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर मोक्षदा मधुकर चौधरी (एफ. वाय. बी.एस्सी.) हिची निवड झाली आहे. या वर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ ५६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती.

अमरावती एन.सी.सी. ग्रुप आणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन मधून मोक्षदा हिने उत्कृष्ठ कामगिरी करत महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या वतीने दिल्ली येथील इंटर डायरेक्टरेट दरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धान्मध्ये (फ्लेग एरिया, निबंध, काव्य ) हिरेरीने सहभाग घेतला. कोविड काळात अनेक आव्हानांना तोंड देत मोक्षदाने दिल्ली पर्यंतचा खडतर प्रवास अखंड ठेवण्यात यश संपादन केले आहे.

मोक्षदाच्या या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालाच्या इतिहासात आणखीन एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, अमरावती ग्रुपचे कमांडर ब्रिगे. एस.के. झा, १८ महाराष्ट्र एन.सी.से. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रविण धिमन, प्राचार्य प्रो. एस.एन. भारंबे, कला शाखेचे प्रमुख आणि माजी एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट.डॉ. बी. एन. केसूर यांनी मोक्षदाचे विशेष अभिनंदन केले. लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे, सी.टी.ओ. गोविंद पवार, सी.टी.ओ. ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग आणि पी.आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.