महाराष्ट्र आणखी गारठणार; हवामान खात्याचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात सध्या ऋतूंचा चांगलाच जांगडगुत्ता झालाय. अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात थंडीचा तडाखा वाढला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवला होता.

अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही भागात थंडीची हीच स्थिती राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. परिणामी पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मोसमातील सर्वात किमान तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. त्यामुळे पहाटेसह दिवसभर हुडहुडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यात सातत्याने बर्फवृष्टीही होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने गार वारा सुटला आहे. परिणामी महाराष्ट्र आणि मुंबईतील किमान तापमान अधिक घसरले आहे. त्यामुळे महामुंबईतही थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने राज्यात गारवा अनुभवता येणार आहे.

गेल्या २४ तासांत थंडीचा पारा घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशातील नागरिकांनी या मोसमातील सर्वात कडक थंडीचा अनुभव घेतला आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.