उमेदवारीचे आमिष देत महिलेवर बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला बेड्या

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात (V.P. Police Station Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आलं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्याला अटक केली आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील विभाग अध्यक्ष वृशांत वडके यांना अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे.

आरोपीने सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या दरम्यानच्या काळात बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी गिरगावमध्ये वास्तव्यास असून पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.