Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आ. राजूमामा भोळेंचा वाढदिवस लोकसेवा, जनसेवा माध्यमातुन साध्या पद्धतीने साजरा
    जळगाव

    आ. राजूमामा भोळेंचा वाढदिवस लोकसेवा, जनसेवा माध्यमातुन साध्या पद्धतीने साजरा

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 13, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भाजप जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांचा आज दि. १३ जुन सोमवार रोजी  भाजप जिल्हा महानगर तर्फे जन सेवा हिच राष्ट्र सेवा या भावनेने आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस साजरा केला.  सकाळी १० वाजता पांझरा पोळ येथे जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते गोशाळेत गाईंना गो ग्रास (लापसी देऊन) कार्यक्रमाची सुरुवात केली.  यानंतर ११ वाजता भाजप कार्यालय येथे कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या २५ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

    तसेच दुपारी १२ वाजता मातोश्री वृध्दाश्रम येथे आजी आजोबा यांना पुरण पोळी व आमरस जेवनाचा आस्वाद दिला.  भाजप महानगरातील ९ मंडला वृक्षारोपण, रक्तदान कार्यक्रम घेण्यात आले.  मुख्य कार्यक्रम भाजप कार्यालय वसंत स्मृति येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल त्रिपाठी यांनी केले व दिपक सुर्यवंशी यांनी आ. सुरेश भोळे यांच्या विषयी सांगितले कि, सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी व अहोरात्र जनतेची सेवा करणारे आपले सर्वांचे लाडके आमदार सुरेश दामु भोळे होय.

    संपूर्ण महाराष्ट्रात मामांच्या कार्याची दखल घेतली जाते, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट असुन अशा लोकप्रिय नेतृत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आ. राजु मामा यांच्या कार्याविषयी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख  मनोज भांडारकर, प्रल्हाद सोनवणे यांनी अनुभव सांगितले.

    कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, मा जि प सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे, भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, डॉ. वीरेन खडके, राहुल वाघ, राजू मराठे, रेखाताई कुलकर्णी, मनोज भांडारकर, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गणेश माळी, विठ्ठल पाटील,  मंडल अध्यक्ष शक्ति महाजन, उमेश सुर्यवंशी,  नगरसेवक मयूर कापसे, सुरेश सोनवणे, आघाडी अध्यक्ष हेमंत जोशी, लाताताई बाविस्कर, आनंद सपकाळे, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, संजय वाणी, गणेश पाटील, दीपक बाविस्कर, भास्कर जुनागाढे, मालती जुनागाढे, महिला मोर्चा सरोजताई पाठक, शोभाताई कुलकर्णी, पूजा पाटील, छाया सारस्वत, शालू जाधव युवा मोर्चाचे अबोली पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, गौरव पाटील, दिनेश पुरोहित, यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले.

    jalgaon MLA Rajumama Bhole
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif