जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
“समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !” अशी समाजाला शिकवण देणाऱ्या परम पूज्य श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने जळगांव जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी बी. जी.नाईक, गजानन पाटील, बी. ए. बारी आणि स्वाती सिद्धपूरे तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कार्यरत कर्मचारी दादासाहेब वाघ आणि संजय दोरकर यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील जवळील “उजाड कुसुंबा” या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ५ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे आज रविवार दि. १२ रोजी सकाळी १०.३० वाजता समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय इखे, शिक्षक अविनाश पाटील, अंगणवाडी सेविका नौशाद तडवी, ग्रामपंचायत सदस्य बेबाबाई तडवी आणि समाबाई तडवी यांचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.