ठाकरे गटातील १२५ जणांवर गुन्हे दाखल, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आरोप

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

बाळापूर (Balapur) व अकोला (Akola) जिल्ह्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी सोमवार, ता. १० एप्रिल रोजी अकोला येथून नागपूरकरिता (Nagpur) संघर्ष यात्रा काढली होती. राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी शेकडो शिवसैनिकांसह ६९ खेड्यातील ग्रामस्थ सहभाग झाले होते. जिल्ह्यात जमावबंदी असताना आमदार नितीन देशमुख यांनी नागरिकांना एकत्र केल्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह १२५ जणांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पाणी नागपूर येथे जाऊन देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत एकत्र झालेल्या आमदारांसह १२५ जणांवर जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.