अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हेनगर भागातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह एक ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली आहे.

वाळूची चोरटी वाहतूक शारदार आश्रम शाळा परिसरातील रस्त्यावरुन होत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास या परिसरातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एम.एच. १९, सी.झेड ५९५५ या क्रमाकांच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर व वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरवरील चालक बजानन गौरव वाघ रा. सावखेडा व ट्रॅक्टरमालक या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.