मू. जे. महाविद्यालयात ‘’हाक माय मराठीची’’ अभिवाचन कार्यक्रम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘हाक माय मराठीची’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मराठीतील कथा, कविता, ललितलेख, पत्र व आत्मचरित्र या विविध साहित्यप्रकारातील निवडक भागांचे अभिवाचन केले. सिद्धी उपासनी हिने वाढदिवस जी.एं चा- (पत्र), संजना कडोले व प्राची सैतवाल यांनी तीन कलावंत –वि.स.खांडेकर (लघुकथा), राधिका बोरसे हिने पुष्पमंडित भाद्रपद- दुर्गा भागवत (ललित लेख), चंदन भामरे याने खोप्यामधी खोपा –बहिणाबाई चौधरी (कविता), श्रीकृष्ण माळी याने आई तुझा हात परीस –प्रशांत मोरे (कविता), चंचल धांडे व चंदन भामरे यांनी किडलेली माणसं- गंगाधर गाडगीळ (कथा), मानसी शर्मा हिने चिमण्या- ग्रेस (ललित लेख), डॉ. विलास धनवे यांनी माय- स.ग.पाचपोळ (कविता), डॉ.विद्या पाटील यांनी माझा बाबा- अनिल अवचट, प्रा. किर्ती सोनवणे यांनी असेन मी नसेन मी –शांता शेळके (कविता), डॉ.अतुल पाटील यांनी कृष्णाकाठ – यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्र), प्रा. गोपीचंद धनगर यांनी दालगंडोरी -अशोक कोतवाल (ललित लेख), व डॉ. योगेश महाले यांनी माझ्या मना बन दगड – विंदा करंदीकर (कविता) या विविध साहित्य प्रकारांचे सादरीकरण केले. याप्रसंगी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक बंधू-भगिनी व विविध शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.