जामनेरात ‘परीक्षा पे चर्चा ‘ अंतर्गत न्यू इंग्लिश स्कुल येथे चित्रकला स्पर्धा

0

लोकशाही न्युज नेटवर्क

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी. यासाठी संपूर्ण देशात अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने देशातील सर्व शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत यातून राबविण्यात येत असून देशातील मुलांना त्यांच्याकडील कौशल्य व विविध गुणांना वाव मिळण्यासाठी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर तर्फे इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

शहरातील न्यु इंग्लिश स्कूल शाळेत सुद्धा या स्पर्धेचे उद्घाटन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रथम नगराध्यक्षा साधना महाजन यांनी कमळाचे चित्र रेखाटुन कार्यक्रमास सुरुवात केली. शहरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते.

प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी आणि बक्षीस तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते शिवाजी नाना सोनार, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शहराध्यक्ष- तथा नगरसेवक आतिश झाल्टे,गटनेते- डॉ. प्रशांतभोंडे , रविंद्र झाल्टे ,शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, शालेय शिक्षण आहार अधिक्षक काळे सर, संचालक दिलीप महाजन, मुख्याध्यापिका प्रतिभा नरवाडे, पर्यवेक्षक गोतमारे सौ.शिरसाठ, व्ही.डी.पाटील, काझी सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. सदर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सुञसंचालन रुपेश बाविस्कर यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य किरण पाटिल तसेच आभार सुभाष पवार ता.संयोजक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपचे सर्व युवा मोर्चा पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.