लोकशाही न्यूज नेटवर्क
फैजपूर येथील ताहानगर मध्ये मारुख हस्पिटल मध्ये आज दिनांक २३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात रक्तदाब, मधुमेह शुगर तसेच इकोकोडिंगैरफ सहित अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच यावेळी ईसीजी आणि शुगर टेस्ट देखील मोफत करण्यात आल्या.
या शिबिरात सारा मल्टीस्पेशालिटी हस्पिटल प्रा.लि.जळगाव ची टीम डॉ. नविद मेमन (एमबीबीएस,एमडी मेडिसिन) यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. सदर शिबिरात मारुख हॉस्पिटल फैजपूर चे संचालक डॉ. मुदसर नजर, डॉ. शबाना मुदसर याचे अनमोल सहकार्य लाभले या वेळी रमिझ, मुखकार्यकारी अधिकारी देशमुख जे एस, सुवर्णा कोळी (ए.एन.एम.), शुभांगी देशमुख (ए.एन.एम.), सौरभ निकम, राईल लॅब चे जुनेद शेख, वसिक शेख, काशीफ यांच्यासह एम मुसा जनविकास असंघटित श्रमिक कोहेनुर कामगार संघटना चे अध्यक्ष शाकिर मलिक यांचे अनमोल सहकार्य लाभले व शिबिरात रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिआचा लाभ घेतला.