धनाजी नाना महाविद्यालयात बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समिती व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहुदय सम्राट, शिवसेना निर्माता बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे संस्थापक, भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ आशा मिरगे, फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व मल्ल्यारपण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, उपप्राचार्य प्रा व्ही सी बोरोले, उपप्राचार्य डॉ एस व्ही जाधव यांच्यासहित राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन डॉ शरद बिऱ्हाडे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत इतर मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयात किशोरवयीन मुलामुलींचे समुपदेशन आणि लैंगिक शिक्षण व लैंगिक शोषणातून होणाऱ्या गुन्ह्यांवर कायद्याची चौकट या विषयावर डॉ आशा मिरगे यांनी प्रबोधन केले. यावेळी धनाजी नाना महाविद्यालय कनिष्ठ विभाग, म्युनिसिपल हायस्कूल फैजपुर, कुसुमताई चौधरी माध्यमिक विद्यालय फैजपूर, मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेज, भारत विद्यालय न्हावी या शाळेतील किशोरवयीन मुला-मुलींना प्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.