२० वर्षीय विवाहिता लहान मुलासह बेपत्ता

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

खडकदेवळा ता. पाचोरा येथील २० वर्षीय विवाहिता लहान मुलासह अचानक बेपत्ता झाली आहे. पतीच्या खबरीवरुन पाचोरा पोलिसात पत्नीसह मुलगा मिसिंग झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

खडकदेवळा ता. पाचोरा येथील पुनम युसुफ तडवी (वय २०) ही विवाहिता दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६:३० वाजेपासून ते रात्री ९ वाजेच्या सुमारास खडकदेवळा येथील राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. रंगाने सावळी, डोक्याचे केस काळे, चेहरा लांबट, उंची ५ फुट ६ इंच, परिधान केलेले वस्त्र हिरव्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे ब्लाऊज, पायात हिरव्या, पांढऱ्या रंगाची सॅन्डल, गळ्यात मंगळसूत्र, बोली भाषा मराठी, तसेच विराट नामक मुलाच्या अंगात लाल रंगाचा फुल बाहीचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, केस काळे, उजव्या हातात काळ्या रंगाचा धागा बांधलेला असे दोघांचे वर्णन आहे.

पती युसुफ भिकन तडवी यांचे खबरीवरुन पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली असून बेपत्ता असलेल्या विवाहिता व मुलाचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन कदम हे घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.