२२ वर्षीय तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तरूणाने आसोदा रेल्वे गेट (Asoda Railway Gate) समोर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपुर्वी तरूणाच्या वडीलांनी देखील धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात (Nashirabad Police Station)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लखन संजय सोनवणे (Lakhan Sanjay Sonwane) (वय २२, रा. सुनसगाव ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह वास्तव्याला आहे. सुनसगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. बाहेर जावून येतो असे घरात सागुन गेलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खंबा क्रमांक ४३३/२१ येथे पवन एक्सप्रेस समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. मयताच्या आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परिवार आहे.

घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. लखनने आत्महत्या का केली याचं अद्याप कारण समजू शकले नाहीय. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.