गडकरी दिल्लीतून आऊट, तर फडणवीस इन…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भाजपने (BJP) केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह (Arun singh) यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(नरेंद्र Modi), अमित शहा(Amit Shaha), जेपी नड्डा (JP Nadda) यांच्यासह देशभरातील भाजपच्या मुख्य नेत्यांची नाव आहे. या यादीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचंही नाव आलं आहे. भाजपने आता फडणवीस यांच्यावर एकाप्रकारे मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सर्वात मोठी घडामोड आहे. दिल्लीमध्ये आता फडणवीस यांचा दबदबा आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin  gadakari) यांना मात्र वगळण्यात आले आहे. सलग दुसऱ्या यादीतून गडकरींचं नाव वगळण्यात आल्यामुळे गडकरींचा पत्ता कट झाला आहे.

त्या बोर्डातून नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाव वगळण्यात आलं आहे. या समितीत आता एकही मराठी माणूस नाही. उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक समिती ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी कोणती असावी, कुणाला संधी दिली पाहिजे, याबद्दल शिफारस करत असते. आता फडणवीस यांची वर्णी लागल्यामुळे दिल्लीमध्ये त्याचं नक्कीच वजन वाढलं आहे. एकाप्रकारे भाजपने (BJP) फडणवीस (Fadanvis) यांच्यावर विश्वास (Faith) टाकला आहे.

भाजपच्या संसदीय समितीतील नावं

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित भाई शाह

बी. एस. येदयुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के. लक्ष्मण

इकबाल सिंह लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जटिया

बी एल संतोष (सचिव)

केंद्रीय निवडणूक समितीच्या १५ सदस्यांची नावे

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित भाई शाह

बी. एस. येदयुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के. लक्ष्मण

इकबाल सिंह लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जटिया

भूपेन्द्र यादव

देवेन्द्र फडणवीस

ओम माथुर

बीएल संतोष (सचिव)

वनथी श्रीनिवास

Leave A Reply

Your email address will not be published.