जामनेर , मुक्ताईनगर तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

0

जळगाव ;- जामनेर आणि मुक्ताईन नगर तालुक्यातील गावांमधून एका १६ आणि १४ वयोगटातील मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याप्रकरणी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला ३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार घडला असून तिचा सर्वत्र शोध घेऊन सुद्धा ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी ९ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील एका 14 वर्षे मुलीला पळवून नेल्याचा प्रकार ९ डिसेंबर रोजी सकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.