मिरज, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मिरज येथून हज यात्रेसाठी 40 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ वाजता घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसला आग लागली. मिरज येथून मुंबई डॉल्फिन कंपनीच्या एमएच 03 सीपी 4500 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने तासवडे टोल नाक्यावर आग लागली. सध्या या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाली होती. या अपघातात लोक आगीपासून थोडक्यात बचावले. काही लोकांचे चेहरे भाजले असले तरी कोणीही जखमी झालेले नाही. बसमधून धूर निघत असल्याचे पाहून चालक सावध झाला, त्यामुळे लोकांचे प्राण वाचले. आगीची माहिती मिळताच तातडीने बसच्या डीक्कीतून सामान बाहेर काढण्यात आले.