Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुण दगावला
    गुन्हे वार्ता

    धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुण दगावला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- एका अनोळखी परप्रांतीय तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील म्हसावद गावाजवळील डाऊन रेल्वे लाईनवर मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव तालुक्यातील म्हसावद गावाच्या नजीक असलेल्या डाऊन रेल्वे लाईन वरील खंबा क्रमाक ४१५ जवळ एक ३० ते ३५ वर्षीय अनोळखी परप्रांतीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान हा तरूण धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल राठोड, राहूल पवार, नितीन चिंचोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. त्याच्या खिश्यात बिहार ते मुंबई असे तिकिट आढळून आले असून मयत हा बिहार राज्यातील असून तो मुंबईवरून बिहार राज्यात घरी जात असल्याचे समजते. या घटनेबाबत बुधवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif